औरंगाबाद प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर-येथे ११ जानेवारी-२०२३ ,रोजी-राजमाता जिजाऊ यांच्या जयंती निमित्त सिंदखेडराजा येथील जिजाऊ जन्म दिवस उत्साहात सहभागी होण्यासाठी दरवर्षी प्रमाणे याही वर्षी या दिनाच्या एक दिवस पूर्व ला, दि११जानेवारी,२०२३रोजी वैजापूर येथून “जिजाऊ रथ” सिंदखेडराजा येथे सकाळी सात वाजता रवाना झाला , हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून निघालेल्या या रथाला सामाजिक कार्यकर्ते व स्वच्छतादूत धोंडीरामसिंह राजपूत यांनी ध्वज दाखविला,मराठा महासंघ शाखा
वैजापूर च्या वतीने मोती भाऊ वाघ गेल्या आठ वर्षांपासून “जिजाऊ रथ”सिंदखेडराजा येथे नेतात,व उत्सवात सहभागी होतात, श्री राजपूत यांनी जिजाऊ यांच्या प्रतिमेला अभिवादन करीत या रथ यात्रेला शुभेच्छा दिल्या , या प्रसंगी रथयात्रा प्रमुख मराठा सेवा संघाचे मोती भाऊ वाघ,राहुल मापारी व बाबासाहेब साळुंके हे सारथी ,दीपाली खैरनार, ऋतुजा चांगदेव खैरनार,शिवभक्त फकिरा गलांडे,अक्षय नजन यांच्या सह शिवभक्त उपस्थित होते(फोटो कॅप्शन- माँ जिजाऊ प्रतिमा पूजन व अभिवादन करून ध्वज दाखविताना धोंडीराम राजपूत,मोती वाघ,फकिरा गलांडे,व राहुल मापारी)
Users Today : 33