केळी पिकाच्या उत्पादन वाढीसाठी करपा (सिगाटोका) रोगाचे नियंत्रण आवश्यक; कृषी अधिकारी एस.जी.वाघ

Khozmaster
2 Min Read

सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत सोयगाव तालुक्यात व सावळदबारा परिसरातील येथील प्रगतशील शेतकरी या.सभापती धरमसिंग चव्हाण यांच्या शेतात सोयगाव येथील तालुका कृषी अधिकारी एस.जी.वाघ यांनी केळी पिक पाहणी करता भेट दिली असता केळी पिकावर येणाऱ्या करपा या रोगाबद्दल चिंता व्यक्त करून या रोगाबद्दल शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. केळी पिकावर करपा रोग येणे याचे लक्षणे म्हणजे खालील पानांवर सुरवातीला लक्षणे दिसतात. पानांवर लहान पिवळसर लंबगोलाकार ठिपके कालांतराने ते मोठे होऊन आतील भाग तपकिरी काळपट रंगाचा होतो. ठिपक्याभोवती पिवळ्या रंगाचे वण दिसतात.झाडावर पानांची संख्या कमी होते. त्यामुळे घडांचे पोषण व्यवस्थित होऊ शकत नाही. परिणामी घडावरील फळे आकाराने लहान राहतात. फळातील गर अकाली पिकतो.

रोगास अनुकूल बाबी रोगग्रस्त

बागेतील कंदांचा वापर. शिफारशीत बेणेप्रक्रियेचा अभाव. पीक फेरपालटीचा अभाव. शिफारशीपेक्षा कमी अंतरावर लागवड. पावसाच्या पाण्याचा अयोग्य निचरा. बागेमध्ये व सभोवताली सर्वसाधारण स्वच्छतेचा अभाव.कार्यक्षम नियंत्रण हा रोग एकात्मिक रोग नियंत्रण तंत्राच्या अवलंबनाने नियंत्रित होऊ शकतो. मशागतीत योग्य फेरपालट, रोगग्रस्त पानाचा नाश व योग्य बुरशीनाशकाचा वापर केल्याने रोगाचै व्यवस्थापन करता येऊ शकते.मशागत केळीची लागवड ओढे, नदीनाले यांच्या काठावरील शेतात आणि चिबड जमिनीत करु नये.केळीची लागवड शक्यतो मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जुन महिन्याच्या पहिल्या आठवड्यात करावी अशे प्रतिपादन सोयगाव कृषी विभागाच्या वतीने तालुका कृषी अधिकारी एस जी वाघ, कृषी सहाय्यक कर्मचारी मानसिंग भोळे, कृषी सहाय्यक अर्जुन सुरडकर यांनी उपस्थित शेतकऱ्यांना व गावातील ग्रामस्थांना केले.

 

0 9 4 7 4 3
Users Today : 32
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *