सोयगावं तालुक्यातील नादांतांडा येथे हानुमान मंदिराच्या भिंतीजवळच घाणीचे साम्राज्य

Khozmaster
2 Min Read

ग्रामसेवक प्रदीप पाटील यांचे गावात साचलेल्या घाणीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष सोयगांव तालुका गोकुळसिंग राजपूत यांचा ग्राउंड रिपोर्ट सोयगांव तालुक्यातील नादांतांडा येथील अकार्यक्षम ग्रामसेवक प्रदीप पाटील नांदाताडा येथे महिन्यातून फक्त पंधरा दिवसात एकच चक्कर कशी तरी मारतात व पुन्हा येथील ग्रामस्थांना ग्रामपंचायतचे उंबरठे झिंजावावे लागत आहे.नेहमीच दांडी बहादर ग्रामसेवक प्रदीप पाटील यांना गावांचे वावडे असल्याचे दिसून येत असून मुख्यालयी राहण्याचा शासनाचा आदेश असतांना सुद्धा ते मुख्यालयी थांबत नाही.जाणीवपूर्वक नादांतांडा गावाकडे दुर्लक्ष करत असून गावातील नागरिक त्रस्त झाले आहे.या बेजबाबदार ग्रामसेवकाला कुणाचा तरी आशीर्वाद असलेल्या ने ते बेजबाबदारपणाने वागत आहे.एकतर राज्यात कोविड-19 चे वारे वाहत असून राज्य सरकारने याची खबरदारी घेत राज्यातील सर्व आरोग्य यंत्रणेला, ग्रामपंचायतीला, एकंदरीत सर्वच विभागाला सतर्कतेचा इशारा दिला आहे. कोविडचे प्रमाण जरी राज्यात कमी असले तरीही नागरिकांनी आपली खबरदारी बाळगून गावात, परिसरात घाणीचे साम्राज्य दिसले नाही पाहिजेत त्यासाठी आपणच आपली स्वच्छता राखावी असे सर्व विभागांना यापूर्वीच निर्देश दिल्याचे अधिकृत सुत्राकडून माहिती मिळालेली आहे.परंतू सोयगाव तालुक्यातील नादांतांडा जि. प. प्रा. शाळेच्या संरक्षण भिंतीला लागूनच व मारोती मंदीराच्या भिंतीला आजूबाजूच्या लोकांनी उकीर्डे टाकलेले असल्याने शाळेत विद्यार्थ्यांना त्याच उकिर्ड्यातून घाण तुडवत येणे जाणे करावे लागत आहे.तसेच त्याच उकीर्ड्यावर रस्त्यामध्येच लहान मुले मुली शौचालयास बसतात त्यामुळेच विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झालेला आहे. पुन्हा नादांतांडा जि. प. प्रा. शाळेच्या संरक्षण भीतीला लागून व मारोती मंदीराच्या जवळ बरेच लोकांनी बेकायदेशीर अतिक्रमण केलेले आहे.याकडे हे महाशय बेजबाबदार ग्रामसेवक प्रदीप पाटील हे मात्र जाणूनबुजून झोपेचे सोंग घेत असून दुर्लक्ष करत आहे.यासंदर्भात नागरिकांनी नादांतांडा ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवक प्रदीप पाटील यांना सदरील अतिक्रमण हटवून, भिंतीजवळील साचलेली घाण हटवून विद्यार्थ्यांना शाळेत जाण्या येण्यासाठी

0 9 4 7 4 4
Users Today : 33
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *