नंदुरबार शिवारातील एका शेतातील पत्राच्या शेडमधून कापूस चोरी केली आहे. सदर प्रकरणी साक्री पोलीस ठाणे येथे गुरनं.415/2022 भादंवि कलम 379 प्रमाणे गुन्हा नोंद आहे. दि.27 नोव्हेंबर 2022 रोजी साक्री तालुक्यातील आष्टाणे गाव शिवारातील एका शेतातील पत्राच्या शेडमधून कापूस चोरी केली आहे. सदर प्रकरणी साक्री पोलीस ठाणे येथे गुरनं.417/2022 भादंवि कलम 379 प्रमाणे गुन्हा नोंद आहे. दि.30 ऑक्टोबर 2022 रोजी साक्री तालुक्यातील शेवाळी गाव शिवारातील एका शेतातील कांद्याच्या शेडमधून कापूस चोरी केली आहे. सदर प्रकरणी साक्री पोलीस ठाणे येथे गुरनं.340/2022 भादंवि कलम 379,461 प्रमाणे गुन्हा नोंद आहे. वरील प्रमाणे ताब्यात घेण्यात आलेले एकूण-05 संशयीत आरोपीत व 02 अल्पवयीन यांचेकडून नंदुरबार तालुका पोलीस ठाणेचे 02 गुन्हे व साक्री पोलीस ठाणे, जि.धुळे चे 06 गुन्हे. असे एकूण – 08 कापूस चोरीचे गुन्हे उघडकीस आलेले आहेत. ताब्यात घेण्यात आलेले संशयीत आरोपी दिलीप किशोर भिल, (20 ) ऋतीक रमेश ठाकरे, (18 ) सुरेश रामलाल माळीच, (25) जगदीश राजू माळचे, (20 ) प्रमोद सुकदेव शिवदे, (25 ) व 02 अल्पवयीन यांना गुन्ह्याचे तपासकामी नंदुरबार तालुका पोलीस ठाणे येथे जमा करण्यात आलेले असून सदर आरोपीतांकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता नाकारता येत नाही असे नंदुरबार जिल्ह्या पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी सांगितले. ही कामगिरी नंदुरबार जिल्ह्या पोलीस अधीक्षक, नंदुरबार पी.आर.पाटील, अपर पोलीस अधिक्षक निलेश तांबे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर, राकेश वसावे, बापु बागुल, सुनिल पाडवी, विशाल नागरे, मोहन ढमढेरे, अविनाश चव्हाण, शोएब शेख, राजेंद्र काटके यांच्या पथकाने केली कारवाई.
Users Today : 27