औरंगाबाद प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत औरंगाबाद : एक महिन्यापूर्वी स्वताच्या बायकोचा खुन करून फरार असलेल्या नवऱ्याला पैठण पोलिसांनी जालना परिसरात जेरबंद केले, अशी माहिती पोलीस अधीक्षक मनीष कलवानीया यांनी दिली. ज्ञानेश्वर पुंडलिक पोळ (३५ अंदाजे) रा. भवानीनगर नवीनकावसान ( धंदा मजुरी) पैठण असे आरोपीचे नाव आहे. तर मंदा ज्ञानेशवर पोळ (२८) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.गेल्या तीन वर्षांपासून आरोपी ज्ञानेश्वर पोळ मयत मंदाच्या चारित्र्यावर संशय घेत छळ करत होता. या प्रकरणी पैठण पोलीस ठाण्यात एक महिन्यापूर्वी ६ डिसेंबर २२ रोजी मयताची बहीण इंदू बर्फ हिच्या फिर्यादीवरुन खुनाचा गुन्हा दाखल आहे. यानंतरपैठण पोलिसांनी औरंगाबाद, नगर, बीड, जालना जिल्ह्यात पथके आरोपीच्या शोधात पाठवली होती. आरोपीचे फोटोग्राफही चारही जिल्ह्यात वितरित केले होते. शेवटी जालना शहर परिसरात आरोपी असल्याची माहिती खबऱ्याने पोलिसांना दिली. वरील कारवाई पोलीस अधीक्षक मनीष कलवानीया, उपाधीक्षक लांजेवार, डॉ. विशाल नेहूल यांच्या मार्ग दर्शनाखाली पोलीस निरीक्षक किशोर पवार आणि पैठण पोलिसांनी पार पाडली.
Users Today : 33