औरंगाबाद प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूतऔरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील खंडाळा येथे शिर्डीच्या साई बाबांचे साई सच्चरीत पारायण सुरू आहे, गुरुवारता,१२/१/२३ रोजी या पारायण ची सांगता आहे ,त्या निमित्त येथील साई क्रांतिरत्न व शैक्षणिक मंडळ मार्फत साईबाबा व प्रभूरामचंद्र यांच्या मूर्तीची भव्य मिरवणूक काढण्यात आली,या मिरवणुकीत वैजापूरचे धोंडीरामसिंह राजपूत प्रति साईबाबा च्या रुपात सहभागी होऊन त्यांनी साई भक्तांना शिर्डीच्या साई बाबांची अनुभूती साक्षात साईबाबा बनून दिली,त्यामुळे साई भक्त व गावकरी खूप आनंदित झाले, त्यांच्या समवेत कोते पाटील यांच्या भूमिकेत श्याम उचित होते,तर म्हाळसापती च्या भूमिकेत सुरेश शेलार होते,बायजामाय च्या भूमिकेत पूजा होती,चार तास ही पालखी मिरवणूक चालोली,साईबाबा जसे आपल्या भक्त परिवार सोबत द्वारकामाईत जात तसेच साक्षात चित्र खंडाळ्यात पाहायला मिळाल्याने खंडाळा वाशी खूप आनंदित होऊन त्यांनी आनंद घेतला,अशोक आप्पा पवार, संतोष पवार,नितीन गायकवाड यांच्या सह साई माऊली ग्रूप चे रामभाऊ उचित यांनी सहभाग नोंदविला
Users Today : 33