संदीप मानकर यांना राज्यस्तरीय “महात्मा फुले समता पुरस्कार” जाहीर

KHOZ MASTER
1 Min Read

सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत :-आपल्या कर्तबगार आणि उल्लेखनीय लेखणीने सामाजिक न्यायासाठी शासनाच्या आणि प्रशासनाच्या विरोधात आवाज उठवून अनेक सामाजिक प्रश्नांना आपल्या आदर्श आणि शोध पत्रकारितेतून उचित न्याय देणारे सिल्लोड तालुक्यातील अनाड येथील पत्रकार संदीप दादाराव मानकर यांना उत्कृष्ट पत्रकारितेच्या अनुषंगाने समता ग्रामीण विकास प्रतिष्ठान व आपले ज्ञानपंख वृत्तपत्र यांच्या वतीने दिला जाणारा सन-2022 चा राज्यस्तरीय “महात्मा फुले समता गौरव पुरस्कार” जाहीर झाला असून लवकरच हा पुरस्कार वितरित होणार असल्याची माहिती अध्यक्ष तथा संपादक दशरथ सुरडकर, उपसंपादिका जयश्री सोनवणे, कार्यकारी संपादक प्रविण तायडे व पत्रकार संजय दांडगे यांनी मानकर यांना अभिनंदन पत्राद्वारे कळविली आहे.        संदीप मानकर हे एक उत्कृष्ट पत्रकार असून राज्याचे माजी गृहराज्यमंत्री रमेश दादा बागवे यांच्या मातंग एकता आंदोलन या राज्यव्यापी सामाजिक संघटनेचे ते औरंगाबाद जिल्हाध्यक्ष देखील आहेत. सामाजिक प्रश्नांना न्याय देण्यासाठी त्यांनी अनेक आंदोलने, रास्ता-रोको, उपोषणे व लढे उभारले आहेत त्यांच्या याच कार्याची दखल घेऊन त्यांना हा राज्यस्तरीय पुरस्कार दिला जात असल्याचा अभिमान आयोजकांनी व्यक्त केला. तर या निवडीबद्दल त्यांचे राजकीय, सामाजिक, प्रशासकीय, कला व क्रीडा आदीं सर्वच क्षेत्रांतून अभिनंदन कौतुक केले जात आहे.

 

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *