औरंगाबाद प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील अजिंठा येथील महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साहात संपन्न झाली.या निमित्ताने विद्यालयात वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.वकृत्व स्पर्धेमध्ये 25 विद्यार्थ्यांनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकला व आपल्या वकृत्व गुणाचे कौशल्य सादर केले.याप्रसंगी विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक आगारे बी.एम.यांनी विद्यार्थ्यांना राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांचे राष्ट्रासाठी योगदान याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांनी सुचविलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचा अवलंब करून आदर्श व्यक्तिमत्व बनने आजच्या काळाची गरज आहे असे प्रतिपादन अध्यक्षीय समारोपात ज्येष्ठ शिक्षक झेलवार एस.डी.यांनी केले. याप्रसंगी झालेल्या वकृत्व स्पर्धेत प्राथमिक गटातून प्रथम अपूर्वा सावळे, माध्यमिक गटातून प्रथम – यशस्वी माहोर,आरुषी साळवे व द्वितीय – यश भावसार व उच्च माध्यमिक गटातून प्रथम- नदीम शेख, द्वितीय क्रमांक- प्रणव नरेंद्र खंडेलवाल यांनी पटकाविला. सर्व विजेत्या स्पर्धकांना प्रा.नारायण डिघे व प्रा.एकनाथ जंजाळ यांच्या सहकार्याने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जीवनचरित्राविषयीचे पुस्तके भेट देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी प्रा.अनंत बुलबुले, डॉ.गोपीनाथ डापके यांनी पर्यवेक्षणाचे काम केले. प्रा.घोंगडे के.एस., भाऊसाहेब जंगले,प्रफुल्ल कळम, संजय पायघन, कृष्णा भंडारे, योगेश गोराडे, किरण मोरे, अरविंद सोनवणे,यांसह श्री अरुण चव्हाण देशमुख प्रदेशाध्यक्ष अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य हेही उपस्थित होते तसेच प्राथमिक विद्यालयाचे शिक्षकवृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शितल महाले व वर्षा काळे या विद्यार्थिनींने केले व विद्यालयाचे सांस्कृतिक विभाग प्रमुख गवळी के.एच.यांनी आभार मानले. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची वेशभूषा परिधान केली होती. कार्यक्रमाची सांगता जिजाऊ वंदनाने करण्यात आली.
Users Today : 33