मकर संक्रांती – भोगी सण पौष्टिक तृणधान्य दिन म्हणून साजरा करा; तालुका कृषी अधिकारी एस.जी.वाघ

KHOZ MASTER
1 Min Read

औरंगाबाद प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत सोयगाव २०२३ वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून घोषित केले आहे. सर्वसामान्य नागरिकांना पौष्टिक तृणधान्य पिकांचे आहारातील महत्व आणि फायदे पटवून देण्यासाठी सोयगाव कृषि विभागामार्फत विविध कार्यक्रम घेण्यात येत आहे. त्यानुसार मकरसंक्रांती भोगी सण दरवर्षी राज्यात पौष्टिक तृणधान्य दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे.विविध कार्यक्रमांसोबतच तृणधान्य पिकांचे क्षेत्र, उत्पादन आणि उत्पादकता वाढीसाठी कार्यक्रम हाती घेण्यात येत आहे. प्रत्येक कृषि सहाय्यक मानसिंग भोळे आपल्याकडील गावामध्ये प्रशिक्षण कार्यक्रम, आरोग्यावर आधारित चर्चासत्राचे आयोजन,तृणधान्य पिकांच्या विविध जाती, त्यांचे लागवड तंत्रज्ञान, तृणधान्य पिकवणाऱ्या शेतकऱ्यांच्या यशोगाथा, मुलाखती, तृणधान्य पिकापासून बनवण्यात येणारे विविध उपपदार्थ यांची माहिती देण्यात येतील. प्रगतीशील शेतकरी, आहार तज्ज्ञ, विद्यापीठाचे शास्त्रज्ञांना निमंत्रित करण्यात येणार आहे. मकर संक्रांती भोगी हा दिवस पौष्टिक तृणधान्य दिन म्हणून उत्साहाने साजरा करावा, असे आवाहन कृषि विभागाचे तालुका कृषी अधिकारी एस जी वाघ व कृषी पर्यवेक्षक हेमंत देशमुख यांनी केले आहे.गाव, तालुका, जिल्हा राज्य अशा सर्वच पातळ्यांवर विविध कृती कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहे.भरडधान्याचे उत्पादन क्षेत्र वाढविणे, प्रकिया व त्यांचे पोषणमूल्य लक्षात घेऊन आहारातील वापर वाढविण्यावर भर दिला जाणार आहे.ज्वारी,नागली,वरी या पिकाची उत्पादकता कमी असल्याने शेतकरी या पिकाची लागवड करीत नाही.त्यामुळे आहारातील वापर वाचल्यास मागणी वाढून सोयगाव तालुक्यातील शेतकरी आपोआप लागवडीकडे वळतील विश्वजीत तायडे कृषी विभाग सोयगाव

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *