सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत सोयगाव तालुक्यातील घाणेगांव तांडा येथे प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळेत दिनांक १२ जानेवारी यांच्या संयुक्त विद्यमाने राजमाता राष्ट्रमाता माॅसाहेब जिजाऊ व स्वामी विवेकानंद (राष्ट्रीय युग पुरुष) यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली या कार्यक्रमाचे व प्रमुख पाहुणे यांनी सर्वप्रथम आदरणीय माॅसाहेब राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन प्र.मु.अ.एस.एल.राडोड यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले.प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले कशाप्रकारे राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांचे आदर्श डोळ्यासमोर ठेवून चांगले शिक्षण घ्यावे आपल्या परिवाराचे व भविष्य उज्वल करावे असे प्रतिपादन प्र.मु.अ.संजय पाटील यांनी सर्व विद्यार्थ्यांना संबोधित करताना सांगितले यावेळेस सरपंच सौ.रत्नाताई सुरेश चव्हाण, उपसरपंच हिरा जाधव, मुख्याध्यापक एस.एल.राठोठ, मुख्याध्यापक संजय पाटील, अर्जुन चव्हाण व.अधिक्षक, पत्रकार सुनील चव्हाण,अज्ञानसिंग चव्हाण व शाळेतील सर्व शिक्षकबंधु, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते याबद्दल सविस्तर माहिती अर्जुन चव्हाण सर तथा (सामाजिक कार्यकर्ते)यांनी बोलताना दिली.
Users Today : 32