रूचिता अमित नाईक,महिला आघाडी शहर संघटक नालासोपारा मधिल हजारो विद्यार्थीनी या वसई येथे कॉलेजसाठी व महिला या वसई येथे कामासाठी रोज ये जा करतात प्रवाशांमध्ये महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने वसई येथे जाण्याकरीता लोकलने प्रवास करावा लागतो सकाळी व सायंकाळी लोकलला गर्दी अधिक असल्याने महिला व विद्यार्थीनींना विविध अडचणींचा सामना करावा लागतो. तसेच शासकीय योजनांसाठी लागणारे दाखले काढण्यासाठी तहसिलदार येथे जावे लागते. नालासोपारा (प) ते वसई तहसिलदार बस सुरू करण्याबाबत वर्तक कॉलेज येथिल विद्यार्थ्यानीनी रूचिता नाईक यांच्या कडे मागणी केली होती.महिलांना सुरक्षित प्रवास करता यावा याकरिता महिलांसाठी विशेष नालासोपारा (प) बस डेपो पासुन समेळगाव, सोपारागाव मार्गे निर्मळ, वसई, तहसिलदार पर्यंत बससेवा सुरू करण्याबाबत जिल्हाध्यक्ष निलेश तेंडोलकर साहेब, तालुकाप्रमुख सूदेश चौधरी साहेब उपतालुकाप्रमुख अजित भाऊ खांबे, शहर प्रमुख सुभाष सावंत यांच्या उपस्थित व मार्गदर्शनाखाली महिला आघाडी शहर संघटक रूचिता नाईक यांनी महापालिका आयुक्तांकडे बैठक लावण्यात आली होती. आयुक्तानी सकारात्मक प्रतिसाद देत परीवहन विभागाला तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश दिले.परिवहन विभागाचे उप आयूक्त नानासाहेब कामठे यांनी आचारसंहिता संपताच बससेवा सुरू करण्याचे आश्वासन दिले…..