लोकजागर मंचच्या वतीने नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांच्या सत्काराचे आयोजन

Khozmaster
2 Min Read

भास्कर पेरे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ग्राम परिषदेचे आयोजन रितेश कुमार टीलावत तेल्हारा प्रतिनिधी   लोकजागर मंचच्या वतीने येत्या गुरुवार दि.१९ जानेवारी रोजी भागवत मंगल कार्यालय तेल्हारा येथे तेल्हारा व अकोट तालुक्यातील नवनिर्वाचित ग्रामपंचायत सरपंच,उपसरपंच तसेच सदस्यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी दोन वेळा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त आदर्श गाव पाटोदाचे आदर्श सरपंच भास्कर पेरे पाटील तसेच साद माणुसकीची फाऊंडेशन पुणेचे संस्थापक हरिष बुटले यांच्या खास मार्गदर्शनाखाली तसेच लोकजागर मंचचे संस्थापक अनिल गावंडे,पुरुषोत्तम आवारे,ऍड.सुधाकर खुमकर, लोकजागर मंचचे जिल्हाध्यक्ष मनिष भांबुरकर, प्रमुख संघटक महेंद्र कराळे,प्रहार जनशक्ती पक्षाचे तेल्हारा तालुकाध्यक्ष मुकेश बिहाडे,शहर अध्यक्ष मितेश मल्ल, हिवरखेड ग्रामपंचायत सदस्य रवी घुंगड यांच्या प्रमुख उपस्थितीत ग्रामपरिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच व सदस्यांच्या सत्कारासोबतच त्यांना असलेले अधिकार,कर्तव्ये तसेच विविध शासकीय योजनांसाठी सरकारकडून निधी कसा उपलब्ध करून घ्यावा याचे विशेष मार्गदर्शन करण्यात येणार आहे. निवडणूका संपल्यावर राजकारण बाजूला ठेऊन ग्राम विकासासाठी या नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच व सदस्यांनी आपल्या अधिकारांचा कसा योग्य उपयोग करावा याचे मार्गदर्शन होण्याच्या उद्देशाने लोकजागर मंचचे संस्थापक अनिल गावंडे यांनी या सत्कार सोहळ्याचे व ग्रामपरिषदेचे आयोजन केले आहे.तरी भागवत मंगल कार्यालयात १९ जानेवारी रोजी संपन्न होणाऱ्या या अकोट व तेल्हारा तालुक्यातील अशा प्रकारच्या पहिल्याच कार्यक्रमाला सर्व सरपंच, उपसरपंच ,ग्रामपंचायत सदस्य तसेच नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन लोकजागर मंचच्या अकोट व तेल्हारा तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केले आहे.

0 9 4 7 4 3
Users Today : 32
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *