संतप्त गावकऱ्यांनी केले चक्का जाम आंदोलन) देवेंद्र सिरसाट.नागपूर. सावनेर – रामटेक या राष्ट्रीय महामार्गावरील कोथुळणा गावाजवळील बस स्थानक येथील अनेक वर्षापासून 200 मीटर सिमेंट रस्त्याचे रखडलेले काम त्वरित पूर्ण करा. या मागणीबद्दल नागरिकांनी राष्ट्रीय महामार्गावर शुक्रवार दिनांक 13/01/2023) ला कोथुळणा स्थानक परिसरात संतप्त नागरिकांनी चक्काजाम आंदोलन केले.सावनेर- रामटेक या राष्ट्रीय महामार्गाचे सिमेंट रस्त्याचे काम करण्यात आले.पण कोथुळणा गावाजवळ 200 मीटरच्या रस्त्याचे काम गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहे.त्यामुळे हा रस्ता अपघातास कारणीभुत ठरत असुन रस्त्यावरील वाहतुकीमुळे गावालगत दुकानात व नागरिकांच्या घरांत धुळ जात असल्यामुळे नागरीकांना त्रास सहन करावा लागत आहे. गावाजवळील रस्त्याचे काम लवकरात लवकर व्हावे म्हणून कोथुळणा ग्रामपंचायतीच्या वतीने राष्ट्रीय महामार्ग विभागास वारंवार निवेदन देण्यात आले.पण याबाबीकडे त्यांनी दुर्लक्ष केले.वारंवार निवेदन देऊन ही रस्त्याच्या कामाकडे राष्ट्रीय महामार्ग विभाग लक्ष देत नसल्याने संतप्त गावकऱ्यांनी राष्ट्रीय महामार्ग अडवून चक्का जाम आंदोलन केले.त्यामुळे तीन तास वाहतुक खोळंबली होती.यावेळी खापा पोलीसांचा कडक बंदोबस्त तैनात होता.यावेळी शेकडो नागरीक रस्त्यावर उतरले होते.अखेर राष्ट्रीय महामार्ग शाखा अभियंता किरण मुन यांनी आंदोलनस्थळी पोहचुन गावकऱ्यांची समजुत काढत एका महिन्यात रस्त्याचे काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.त्यानंतर आंदोलनकर्ते शांत झाले.व आंदोलन स्थगित करण्यात आले.जर एक महिन्यात रखडलेल्या रस्त्याचे काम पूर्ण करण्यात आले नाही तर तरपुढील महिन्यात 14 फेब्रुवारी ला याहीपेक्षा तीव्र आंदोलन करण्याचा ईशारा गावकऱ्यांच्या वतीने देण्यात आला.याप्रसंगी बडेगांव जि.प.च्या सदस्या छाया बनसिंगे, कोथुळणा सरपंच गीता आमगांवकर, उपसरपंच हरीश चौधरी,डॉ. प्रकाश लांजेवार, यादराव चौधरी,अनिल कडू,प्रशांत कोलते,धनराज चौधरी,रजत लांबट, उज्ज्वला लांजेवार, देवेंद्र गाडगे उपसरपंच निमतलाई, किरणापुर चे सरपंच ललीत चौरेवार,गणेश काकडे प.स.सदस्य, दिपक काकडे आदि शेकडो ग्रामस्थांची ऊपस्थिती होती.