आत्मा अंतर्गत नांदगाव व वरखेडी बु येथे शेतीशाळा माध्यमातून पौष्टिक तृणधान्य लागवडीचा प्रसार

Khozmaster
1 Min Read

सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत सोयगाव,बी. एस. तौर प्रकल्प संचालक आत्मा औरंगाबाद व ए. ई. साळुंखे प्रकल्प उपसंचालक आत्मा औरंगाबाद यांच्या मार्गदर्शनाखाली रब्बी हंगाम सन २०२२ – २०२३ मध्ये सोयगांव तालुक्यातील मौजे नांदगाव व वरखेडी बु येथे पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त रब्बी ज्वारी पिक शेतीशाळा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे.आज दि.१४.०१.२०२३ रोजी पौष्टिक तृणधान्य दिना निमित्त वरखेडी बु येथे रब्बी ज्वारी पिक शेतीशाळा वर्ग आयोजित करण्यात आलेला होता यात प्रामुख्याने किटकनाशक फवारणी करताना घ्यावयाची काळजी, रब्बी ज्वारीचे आहारात सेवनाचे महत्त्व व फायदे, तसेच जागतिक तृणधान्य वर्षात गावनिहाय करावयाचे नियोजन याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.आजच्या कार्यक्रमात ए. एस. महाजन बी. टी. एम. सोयगांव व एस. एस. चव्हाण यांनी मार्गदर्शन केले.आजच्या कार्यक्रमात गोपीचंद राठोड माजी जिल्हा परिषद सदस्य, सरपंच व गावातील प्रगतिशील शेतकरी यांची उपस्थिती होती.

0 9 4 7 4 3
Users Today : 32
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *