शिवतीर्थ जळकीबाजार शिवजयंती कार्यकारिणी जाहीर

Khozmaster
1 Min Read

नवंयुवकांना कार्यकारिणी संधी मिळाल्याने आनंदाचे वातावरण प्रतिनिधी:-गोकुळसिंग राजपूत जळकी बाजार येथील भारतातील छत्रपती शिवाजी महाराज यांचे तिसरे मंदिर असलेल्या शिवतीर्थ जळकीबाजार गावात दरवर्षी मोठ्या उत्साहात व अनेक समाजउपयोगी उपक्रम राबवित शिवजन्मोत्सव मोठ्या थाटात साजरा होत असते.पंचक्रोशीतील नागरिक,महिला,लहान पासून तर मोठ्या पर्यतचा सर्वांचा मोठया संख्येने सहभाग हा लक्षणीय असतो. या करणे संपूर्ण तालुक्याचे लक्ष जलकीबाजार कडे लागून असते,शिवजन्मोत्सव 2023 च्या नियोजनासाठी, शिवजन्मोत्सव 2023 ची कार्यकारणी नुकतीच जाहीर झाली.या मध्ये अध्यक्ष पदी श्री भानुदास दांडगे,उपाध्यक्ष आकाश दांडगे,सचिव किरण जाधव,कोषाध्यक्ष अंकुश राऊत,कार्याध्यक्ष गौरव दांडगे,गणेश दांडगे यांची सर्वानुमते निवड झाली.संपूर्ण सिल्लोड तालुक्यात बहुचर्चित असलेला शिवतीर्थचा शिवजन्मोत्सव 2023 च्या कार्यकारणीत नवंयुवकांना संधी मिळाल्याने सर्वांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.नुकत्याच पार पडलेल्या नियोजन बैठकीत हा निर्णय घेऊन शिवजन्मोत्सव, पुरस्कार वितरण,महिला व बाल सशक्तीकरण,शिवस्नेहभोजन,यासह अनेक नोयोजनात्मक धोरणावर चर्चा करण्यात आली.या वेळी श्री छत्रपती शिवाजी महाराज मंदिर समितीचे सर्व पदाधिकारी,सरपंच, पोलीस पाटील, व शिवतीर्थ जळकी बाजार चे असंख्य ग्रामस्थांची उपस्थिती होती.अशी माहिती अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे औरंगाबाद जिल्हा अध्यक्ष शिवव्याख्याते प्रदीप जगताप पाटील यांनी बोलताना सांगितले.

0 9 4 7 4 3
Users Today : 32
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *