महिलांच्या सामाजिक,आर्थिक मानसिक व शैक्षणिक उन्नतीवरून देशाची प्रगती मोजतात–जयश्री सोनकवडे- समाजकल्याण उपायुक्त, औरंगाबाद

KHOZ MASTER
1 Min Read

औरंगाबाद प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूतआपले ज्ञानपंख न्यूजऔरंगाबाद ज्या देशाच्या महिला उच्च शिक्षित,उद्यमशील,व कर्तृत्व संपन्न असतात तो देश सर्वच क्षेत्रात उत्तमोत्तम प्रगती करतो कारण जगातील देशाची प्रगती ही महिलांच्या सामाजिक,आर्थिक,मानसिक व शैक्षणिक गुणवत्ता व विकासावरच अवलंबून असते असे प्रतिपादन दि.१३/१/२३ शुक्रवाररोजी औरंगाबाद समाजकल्याण विभागाच्या उपायुक्त जयश्री सोनकवडे यांनी येथील महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक व विशेष सहाय्य विभाग अंतर्गत डॉ,बाबासाहेब आंबेडकर मुलांचे ,मागासवर्गीय मुलींचे शासकीय वस्तीगृह व शासकीय निवासी शाळा यांचे वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षीस वितरण प्रसंगी केले,या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून व्यासपीठावर से,नि, शिक्षणाधिकारी व स्वच्छतादूत धोंडीरामसिंह राजपूत होते त्यांनीही विद्यार्थ्यांना संबोधित केले,ग्रामीण -२चे सरपंच दौलतराव गायकवाड, न,प, पर्यवेक्षक एम,आर, गणवीर ,बाबासाहेब वाघ,शालेय समितीचे ए,सी,पडवळ यांची उपस्थिती होती, आरंभी छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, जिजाऊ माँ साहेब,महात्मा फुले,डॉ,बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमाना अभिवादन करण्यात आले,प्रास्ताविक मुख्याध्यापक निलेश भामरे यांनी केले ,पाहुण्याचें स्वागत गृहपाल जनार्दन गव्हाणे,मुख्यध्यापक निलेश भामरे मुलींच्या वसतिगृह च्या गृहपालक शर्मीला निकाळे यांनी केले,मुलां-मुलींना त्यांच्या विविध क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी मुळे त्यांना प्रमाणपत्र अतिथीच्या हस्ते वाटप करण्यात आले,यानंतर स्नेहसंमेलन कार्यक्रम आरंभ झाला, देशभक्ती पर गीते,समाजिक गीते व नृत्य,कला विद्यार्थ्यांनी सादर केली,या प्रसंगी विद्यार्थ्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.सूत्र संचालन शिवाजी माळी व श्रद्धा गवांदे यांनी केले अजित भागवत यांनी सहभाग नोंदविला.

 

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *