सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत सोयगाव येथील घर बांधकाम चालू असलेल्या बांधकामाच्या आवारातून चोरट्यांनी पाच हजार रुपये किंमतीची विद्युत मोटार चोरून नेल्याची घटना आमखेडा येथील गोपाळ राजाराम पाटील यांच्या घर बांधकाम चालू असलेल्या बांधकामाच्या आवारात घडली. याप्रकरणी सोयगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सोयगाव तालुक्यातील आमखेडा येथे फिर्यादी गोपाळ राजाराम पाटील यांचे घराचे बांधकाम चालू असलेल्या बांधकामाच्या आवारातून रात्रीचा अंधाराचा फायदा घेऊन चोरट्यांनी बांधकामाच्या आवारात चोरी केली. पाण्याची मोटर केबल चोरट्यांनी चोरून नेली. पाच हजार रुपयांची मोटार व ५ हजार रुपयांची केबल असा एकुण सहा हजार रुपयांचे साहित्य चोरून नेले. याबाबत बांधकामाच्या आवारात चोरी झालेली विद्दुत मोटारींची गोपाळ राजाराम पाटील यांनी सोयगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून सोयगाव पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा गु.र.नं.११/२०२३ कलम ३७९,३४ भा.द.वि.दाखल करण्यात आला आहे. सपोनि अनमोल केदार याच्या मार्गदर्शनाखाली तपास अंमलदार बडेॅ करीत असतांनाच सदर गुन्ह्याचे तपास करीत असतांना आरोपी चेतन राजेंद्र सोनवणे वय २३ , दिनेश दिलीप घुसले वय ३० , बाबासाहेब कैलास नेरपागरे वय २८ वर्ष सर्व रा काळेनगर सोयगाव यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून पुढील तपास सपोनि अनमोल केदार सोयगाव यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे अंमलदार बडेॅ करीत आहे.
Users Today : 32