ऊसतोड कामगारांना मायेचे मोफत ब्लॅंकेट वाटप

KHOZ MASTER
1 Min Read

औरंगाबाद प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत वैजापूर येथील सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या निर्भय सामाजिक संस्था च्या वतीने भग्गाव येथील ऊसतोड कामगारांच्या पालावर जाऊन पंधरा कुटुंबीयांना दि.१५/१/२३ रविवार रोजी सायंकाळी ब्लॅंकेट वाटप करण्यात आले,शासनाच्या विधी व न्याय विभागाचे सहआयुक्त महेंद्र महाजन व सुरेंद्र बियाणी यांच्या मार्गदर्शनाखाली निर्भय संस्थेचे बाबासाहेब वाघ यांनी यात पुढाकार घेतला, ऍड प्रवीण साखरे,व सामाजिक कार्यकर्ते तथा स्वच्छता दूत धोंडीरामसिंह राजपुत यांच्या हस्ते हे वाटप झाले,या प्रसंगी राजपूत यांनी धुळ्याच्या ग्रामीण भागातील या कुटुंबाना एकीने राहून एक दुसऱ्याचे सुख,दुःख वाटून घेण्याचे आवाहन केले,मुलांना शिक्षण देण्याचेही आवाहन केले,या समयी नाभिक महामंडळ सचिव दिलीप अनर्थे, आर,विश्वासू,अण्णासाहेब ठेंगडे, गणेश धारबले, यांनीही मायेची चादर म्हणून ब्लॅंकेट वाटप केले, ठेंगडे यांनी सूत्र संचलन केले,निर्भय चे बसबसाहेब वाघ यांनी आभार मानले,या पालावर १५ कुटुंबीय राहतात, मुकरदम रोशन चव्हाण हे या ऊस तोड कामगारांचे प्रमुख आहेत.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *