सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत सोयगाव तालुक्यातील सावळदबारा येथील माध्यमिक व उच्चमाध्यमिक विद्यालय शिवाजी विद्यालयात राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेचे पूजन प्राचार्य पंजाबराव कोलते यांच्या हस्ते करण्यात येऊन अभिवादन केले.व पुढील कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.विज्ञान कला व्यवसाय अभ्यास क्रम विभागा मध्ये भारतीय स्वातंत्र्याचा अमृत मराठवाडा मुक्ती लढा अमृत महोत्सवी वर्ष व योगी अरविंदो घोष सार्धशती वर्षानिमित्त अभ्यासपुरक विभाग वतीने आयोजित किशोरवयीन विद्यार्थिनीचे समुपदेशन याप्रसंगी सरपंच स्वातीताई कोलते यानी वैद्यकीय मुलीचे प्रश्ना संबंधी मार्गदर्शन केले तसेच सपोनि देवीदास वाघमोडे फर्दापूर यानी सायबर गुन्हेगारी संबंधी माहिती दिली विविध कायदे याची माहिती दिली. स्वयंसिध्द होवुन समाजात जीवन जगावे विद्यार्थिनीनी सक्षम बनावे अन्यायास विरोध करावा यावेळी कार्यक्रम अध्यक्ष प्राचार्य पंजाबराव कोलते, प्रमुख मार्दर्शक संस्थांचे अध्यक्ष भाऊराव कोलते पाटील, सचिव रत्नाताई कोलते, प्रा.जीवन कोलते,प्रा.मदनभाऊ डोखळे, प्रा.वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ जयराम घोटी, पंजाबराव शेळके उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा. जीवन कोलते सामाजिक कार्यकर्ते यानी केले प्रास्ताविक प्रा . गणेश मोहने व आभार प्रा.गजानन चव्हाण यानी मांनले विद्यालयातील विद्यार्थिनी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या यासाठी सर्व प्राध्यापक व शिक्षकवृंद यांनी सहकार्य केले.
Users Today : 32