सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत सोयगाव तालुक्यातील फर्दापूर पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक देवीदास वाघमोडे यांना “समता ग्रामीण विकास प्रतिष्ठाण व आपले ज्ञानपंख वृत्तपत्राकडून” दिला जाणारा सन 2022 चा राज्यस्तरीय “महाराष्ट्र पोलिस भुषण गौरव पुरस्कार”जाहीर झाला असून तसे पुरस्कार जाहीर झाल्याचे अभिनंदन पत्र “समता ग्रामिण विकास प्रतिष्ठाण व आपले ज्ञानपंख वृत्तपत्राचे मुख्य संपादक तथा आयोजक दशरथ एन सुरडकर,कार्यकारी संपादक प्रविण तायडे, उपसंपादिका जयश्री सोनवणे यांनी कळवले आहे.लवकरच पुरस्कार वितरण सोहळ्याची तारीख कळविण्यात येणारच असल्यानचेही आयोजकाडून कळविण्यात आले आहे एका कर्तव्यदक्ष माणसातला माणूस शोधणारा, पोलिस खात्यात आपल्या वदीॅच्या पलीकडील सामाजिक ऋणानुबंध जपणारे व्यक्तीमत्व,लोखंडालाही परीस करणारा आधुनिक काळातील खरा आदर्श पुरुष शिलवान पोलीस अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक देविदास वाघमोडे फर्दापूर यांना “राज्यस्तरीय महाराष्ट्र पोलीस भुषण गौरव” पुरस्कार जाहीर झाल्याने सोयगांव तालुक्यातील सावळदबारा परिसरात व तालुक्यात अभिनंदन होत आहे तसेच जेष्ठ पत्रकार गोकुळसिंग राजपूत, पत्रकार संजय दांडगे यांनी अभिनंदन केले असून या निवडीबद्दल राजकीय, सामाजिक, प्रशासकीय, पोलिस प्रशासन,कला व क्रीडा आदी सर्वच क्षेत्रातून अभिनंदन कौतुक केले जात आहे.
Users Today : 32