जेष्ठ पत्रकार गोकुळसिंग राजपूत यांना राज्यस्तरीय “जेष्ठ पत्रकार पुरस्कार” जाहीर

Khozmaster
1 Min Read

सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत सोयगाव तालुक्यातील आपले ज्ञानपंख वृत्तपत्राचे सोयगांव तालुका प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत हे आपल्या कर्तबगार आणि उल्लेखनीय लेखणीने सामाजिक न्यायासाठी शासनाच्या आणि प्रशासनाच्या विरोधात आवाज उठवून अनेक सामाजिक प्रश्नांना आपल्या आदर्श आणि शोध पत्रकारितेतून उचित न्याय देणारे सोयगांव तालुक्यातील सावळदबारा येथील जेष्ठ पत्रकार गोकुळसिंग सुखदेव राजपूत यांना उत्कृष्ट पत्रकारितेच्या अनुषंगाने “समता ग्रामीण विकास प्रतिष्ठान व आपले ज्ञानपंख वृत्तपत्र यांच्या वतीने दिला जाणारा सन-2022 चा राज्यस्तरीय “जेष्ठ पत्रकार पुरस्कार” जाहीर झाला असून लवकरच हा पुरस्कार वितरित होणार असल्याची माहिती अध्यक्ष तथा मुख्य संपादक दशरथ एन सुरडकर, उपसंपादिका जयश्री सोनवणे, कार्यकारी संपादक प्रविण तायडे व पत्रकार संजय दांडगे यांनी गोकूळसिंग राजपूत यांना अभिनंदन पत्राद्वारे कळविली आहे.गोकुळसिंग राजपूत हे एक जेष्ठ पत्रकार असून ते अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती संघटनेचे औरंगाबाद जिल्हाध्यक्ष देखील आहेत. सामाजिक प्रश्नांना न्याय देण्यासाठी त्यांनी अनेक आंदोलने, रास्ता-रोको, उपोषणे व लढे उभारले आहेत त्यांच्या याच कार्याची दखल घेऊन त्यांना हा राज्यस्तरीय पुरस्कार दिला जात असल्याचा आनंद आयोजकांनी व्यक्त केला. तर या निवडीबद्दल त्यांचे राजकीय, सामाजिक, प्रशासकीय, कला व क्रीडा आदीं सर्वच क्षेत्रांतून अभिनंदन कौतुक केले जात आहे.

 

0 9 4 7 4 3
Users Today : 32
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *