शालेय कृराश खेळात अनुराधा शाळेच्या विद्यार्थ्यांची राज्यस्तरावर झेप.

Khozmaster
1 Min Read

पुणे सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय वाशीम क्रीडा परिषद आणि जिल्हा संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विभागीय कृराश क्रीडा स्पर्धा दिनांक 11/01/2023. रोजी कराटे हॉल जिल्हा क्रीडा संकुल वाशीम येथे संपन्न झाले असून , 70 किलो वरील वजन गटात , अनुराधा स्कुलचा विद्यार्थी कामरान खान याने गरुडझेप घेत पुणे येथे होण्याऱ्या राज्य स्तरीय स्पर्धेसाठी नाव नोंदविले आहे.    अनुराधा शाळेचा विद्यार्थी कामरान खान जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार असून वेदांत बोंद्रे, मयुरेश देशमुख , प्रज्वल धनवे ह्या विद्यार्थ्यांनी द्वितीय स्थान प्राप्त करून अनुराधा इंग्लिश स्कुलचे नाव लौकिकले आहे. त्यांच्या उत्कृष्ट खेळाची नोंद घेऊन शाळेच्या प्राचार्या सौ. जया नन्हई व व्यवस्थापिका सौ. सुजाता कुल्ली मॅडम यांनी क्रीडा प्रशिक्षक फईम सौदागर सरांचे व गणेश पेरे सरांचे अभिनंदन केले.    तसेच शाळा समितीच्या अध्यक्षा व संस्थेच्या सचिव मा.अड. वृषालीताई बोन्द्रे व संस्थेचे अध्यक्ष क्रीडा क्षेत्रात विषेश रुची ठेवणारे मा. श्री. राहुलभाऊ बोन्द्रे यांनी विद्यार्थ्यांनी विविध खेळामध्ये प्राविण्य प्राप्त केल्यामुळे विद्यार्थ्यांचे , शाळा समितीचे , क्रीडा प्रशिक्षक तसेच शिक्षक वृदांचे अभिनंदन केले.

0 9 4 6 4 7
Users Today : 61
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *