स्वाभिमानीच्या पीकविमा हक्क मोर्चाला शेतकऱ्यांचा वाढत प्रतिसाद

Khozmaster
2 Min Read

शहर प्रतिनिधी : बालाजी मोरे  पीकविमा कंपनी व शासनाच्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटने कडून येत्या १९ जानेवारी रोजी रिसोड येथे पीक विमा हक्क मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चा साठी स्वाभिमानी कडून तालुक्यातील गावा- गावात जाऊन प्रचार केला जातोय याला शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.                                         यंदाच्या खरीप हंगामात अतिवृष्टीने सोयाबीनचे मोठे नुकसान होऊनही पीक विमा कंपनीकडून बहुतांश शेतकऱ्यांना विम्याचा मोबदला देण्यात आला नाही. तसेच शासनाने अतिवृष्टीची नुकसान भरपाई जाहीर करूनही अनेक शेतकऱ्यांना अद्यापही भरपाई मिळाली नाही या विरोधात या मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे पंचायत समिती समोरील मैदानावरून सकाळी ११ वाजता हा मोर्चा निघणार असून तहसील कार्यालय येथे जाहीर सभा होणार आहे. या मोर्चाला स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर, विदर्भ प्रमुख दामू अण्णा इंगोले, जिल्हाध्यक्ष बाळाजी मोरे यांची प्रमुख उपास्थींती राहणार आहे.       जिल्ह्यातील जवळपास दिड लाख शेतकऱ्यांनी खरीप हंगामात पीक विमा काढला होता तेव्हा शासनाने स्वतः मोठ्या प्रमाणात जाहिरात करून शेतकऱ्यांना विमा भरण्यास प्रवृत्त केले होते. आज मोबदल्याच्या वेळी मात्र शासन कम्पनीला पाठीशी घालण्याचे काम करत आहे. तसेच अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना परपाई देण्याची घोषणा सरकारने केली होती मात्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या अडेल धोरनामुळे अनेक शेतकरी लाभापासून वंचित राहिले राहिले आहेत. पीक विमा व नुकसानभरपाई न मिळालेल्या शेतकऱ्यांना मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटने कडून करण्यात आले आहे.

 

0 9 3 7 1 9
Users Today : 25
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *