देवेंद्र सिरसाट.नागपूर. वर्धा जिल्ह्याला महापुरुषांचा वारसा लाभल्याने 1975 ला जिल्ह्यात दारूबंदी कायदा लागू करण्यात आला. तेव्हापासूनच वर्धा जिल्हा दारूबंदी जिल्हा म्हणून ओळखला जातो. मात्र, दारूबंदी कागदावरच राहिल्याचे चित्र आहे. पोलीस विभागाकडून दररोज कारवाई केली जाते. मात्र, नागरिकांची मानसिकता काही बदलत नसल्याचे चित्र आहे.दारूबंदी जिल्ह्यात मागील वर्षभरात 6 कोटी 57 लाख 49 हजार 405 रुपयांचा मद्यसाठा पोलिसांनी जप्त केला असून, दारूबंदी कायद्यानुसार 121 जणांना न्यायालयाने शिक्षा ठोठावल्याची धक्कादायक माहिती प्राप्त झाली आहे, पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांनी दारू विक्रेत्यांना सळो की पळो करून सोडले आहे .पण, तरी देखील दारूचे पाट वाहणे बंद झालेले नाही. मोहफूल दारूची निर्मिती आणि देशीविदेशी दारूची चोरट्या मार्गाने होणारी वाहतूक अद्याप थांबविता आलेली नाही.जिल्ह्यातील 1350 गावांपैकी नेमकी किती गावे दारूमुक्त आहेत. हा संशोधनाचा विषय आहे. दारूनिर्मितीची केंद्रे वर्धा जिल्ह्यातील सेलू, आष्टी आणि कारंजा तालुक्यातील जंगलबहुल आणि डोंगराळ भागात मोठ्या प्रमाणात गावठी दारूची निर्मिती होते. येथील अवैध दारू प्रकरणी गुन्हे दाखल होतात. न्यायालयात प्रकरणे प्रविष्ट होतात. पण, सक्षम पुराव्याअभावी सर्वच निर्दोष सुटतात. कारवाई वेळी उपस्थित असणारे पंच फितूर होण्याचे प्रमाण देखील अधिक आहे. परिणामी, अवैध दारू विक्री करणाऱ्यांमध्ये एवढा निर्ढावलेपणा येतो कुठून असा प्रश्न उपस्थित होत आहे. रंगेहात सापडणारा दारू विक्रेता तासभराने जामिनावर मोकळा होतो. वर्धा जिल्ह्याच्या सीमेवर सुमारे 80 बार तयार झाली आहेत. वर्धा भोवतीच्या यवतमाळ, नागपूर, बुटीबोरी ठिकाणाहून दारू आणल्या जाते. त्यामुळे दारूबंदी जिल्ह्यात कोट्यवधी रुपयांच्या दारूची उलाढाल होते. पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांच्या मार्गदर्शनात दररोज लाखो रुपयांचा दारू साठा पकडला जात आहे.दारूबंदी जिल्ह्यात पोलिसांनी मागील वर्षभरात 19 पोलीस ठाण्याअंतर्गत 6 हजार 874 गुन्हे दाखल करण्यात आले. यामध्ये 3448 दारू विक्रेत्यांना अटक करण्यात आली असून, तब्बल 6 कोटी 57लाख 49 हजार 405 रुपयांचा देशीविदेशी मद्यसाठा जप्त करण्यात आला.दारूबंदी जिल्ह्यात पोलिसांनी मागील वर्षभरात 19 पोलीस ठाण्याअंतर्गत 6 हजार 874 गुन्हे दाखल करण्यात आले. यामध्ये 3448 दारू विक्रेत्यांना अटक करण्यात आली असून, तब्बल 6 कोटी 57लाख 49 हजार 405 रुपयांचा देशीविदेशी मद्यसाठा जप्त करण्यात आला.पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांनी जास्तीत जास्त गुन्ह्यांत दोषसिद्धी मिळविण्यासाठी पुढाकार घेतला असून, दोषसिद्धी प्राप्त करण्यात येत आहे. मागील वर्षभरात आठ दारू विक्रेत्यांना शिक्षा ठोठावण्यात आली असून, 113 जणांना दारूबंदी कायद्यान्वे शिक्षा ठोठावण्यात आल्याची माहिती आहे.