देवेंद्र सिरसाट.नागपूर.हिंगणा तालुक्यातील निलडोह ग्रामपंचायत अंतर्गत गौतम नगर येथील झोपडपट्टी वर आज( ता. १७)बुलडोजर चालविणारी कारवाई थांबवा या मागणी ला घेऊन माजी आमदार प्रकाश गजभिये यांच्या नेतृत्वात समस्या पिडीतांचा मोर्चा 10 किलोमीटर पायदळ चालुन हिंगणा तहसिल कार्यालयावर धडकला, नायब तहसिलदार ज्योती भोसले.यांना कारवाई थांबविण्याचे निवेदन देण्यात आले .1995 चा जि आर,नंतर 2011 चा जि आर नुसार.पर्यायी व्यवस्था. केल्या शिवाय झोपडपट्टी उठवु नये असे शासनाचे आदेश.असतांना,हि कारवाई एक तर्फी कुणाच्या आदेशा नुसार.केली जात.आहे अशी प्रतिक्रिया माजी आमदार प्रकाश गजभिये यांनी दिली , ग्रामपंचायत ने रोड टाकले,दिवाबत्ती ,हातपंप नाल्या या सोई पुरविल्या,हि जागा म्हणजे सोनेगाव निपानी,आणि निलडोह या गावाची वहीवाट पांदण आहे .जी एमआयडीसी बसली ती खदान बुजवून कंपनीला दिलेली जागा आहे .आमची बाजु मांडण्यासाठी आम्हाला वेळ द्यावा आम्ही रितसर आपली बाजु मांडु अशी विचारणा या वेळी चर्चा दरम्यान केली . शिष्टमंडळात माजी आमदार प्रकाश गजभिये,जि प सदस्य तथा जि.प.राका गटनेता दिनेश बंग,जि प सदस्य संजय जगताप, राकाॅपा सामाजिक विभाग जिल्हा अध्यक्ष संतोष नरवाडे,राकाॅपा जिल्हा उपाध्यक्ष लिलाधर दाभे,ग्रा. प. सदस्य प्रदीप फलके,निलेश वर्मा ,विठ्ठल हुलके,भाई साळवे ,केशव डोंगरे,सौरभ वानखेडे, आतिष झोडापे,सत्यवान मेश्राम,सत्यवान देशभ्रतार ,हेमंत.बिसेन,अमीता युवनाते,कमललाल युवनाते,सुनिल शेंडे,धिरज खंगार,रानी राजपुत, आणि शेकडो महीला पुरुष उपस्थित होते .