भोवरदा चापाडा-फणसपाडा मार्गावर काळ शेती नदीवरील नवीन पूल बांधण्याची मागणी

Khozmaster
2 Min Read
पत्रकार संरक्षण समिती सोमनाथ टोकरे जिल्हा उपाध्यक्ष यांचे जिल्हा परिषद अध्यक्षांणा निवेदन..
 पालघर : सौरभ कामडी               जव्हार तालुक्यातील भवरद्याचापाडा-मोख्याचापाडा मार्गावर अनेक वर्षांपूर्वी बांधलेला अरुंद फुल पावसाळ्यात येणाऱ्या पुराच्या पाण्याखाली सतत जात असल्याने या पाड्यांचा जव्हार शहराशी पूर्णपणे ग्रामस्थांचा संपर्क तुटून दोन्ही गावातील नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत असतो. म्हणून पत्रकार संरक्षण समितीचे पालघर जिल्हा उपाध्यक्ष सोमनाथ टोकरे यांनी पालघर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाशजी निकम यांच्याकडे निवेदन देत या पाड्यांना जोडणाऱ्या नवीन फुल बांधण्याची मागणी केली आहे. मोख्याचापाडा, फणसपाडा, भोवरदाचापाडा, कुंभारखांड या गावाची सुमारे 1500 च्या आसपास लोकसंख्या असलेल्या गावातील लोकांना पावसाळ्यात या अरुंद पुलाचा शालेय विद्यार्थी, रोजगारासाठी तालुक्याच्या ठिकाणी, सरकारी कामानिमित्त तालुक्याच्या ठिकाणी, बाहेरगावी जाण्यासाठी, शेतकरी व रुग्णांना हॉस्पिटल ला जाण्यासाठी  पर्यायी रस्ता नसल्याने मोठी अडचण निर्माण होते. या निवेदनात सोमनाथ टोकरे यांनी जव्हार तालुक्यातील कुंडाचा पाडा, वनवासी, मार्गे  मोख्याचापाडा, भोवरदाचापाडा, फणसपाडा या रस्त्याचे रुंदीकरण करून काँक्रिटीकरण करणे आणि चार पूल नवीन बांधणे हे देखील दोन महिन्यापूर्वी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब, तसेच पालघर जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाशजी निकम साहेब यांना निवेदन सादर केले आहे. कौलाळे ग्रामपंचायत हद्दीतील फणसपाडा-भवरद्याचा पाडा ते मोख्याचापाडा रस्त्याची  अक्षरसा चाळण झालेली आहे. अतिशय वाईट दुर्दशा झाली असल्याने  कुंडाचापाडा ते फणसपाडा या रस्त्याचे रुंदीकरण करून काँक्रिटीकरण करणे, तसेच नदीवरील चार नवीन पूल बांधण्यात यावेत हा रस्ता सुद्धा डांबरीकरण करून देण्याची मागणी त्यांनी जिल्हा परिषद अध्यक्षांकडे केली आहे.
0 9 4 6 4 2
Users Today : 56
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *