Thursday, July 25, 2024

शिक्षक विश्वनाथ अरुण कोकाटे यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल*

खोजमास्टर-वृत्त संकलन.
मेहकर:- मेहकर पोलीस स्टेशन अंतर्गत सुलतानपूर येथील ह्या नावाजलेल्या कॉलेज मध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थी विद्यार्थिनी उच्च शिक्षण घेण्यासाठी येत असतात परंतु कॉलेजमधील वरिष्ठांच्या दुर्लक्षामुळे किंवा व्यवस्थापनाच्या हलगर्जीपणामुळे एका बावीस वर्षीय युवतीवर विनयभंगाचा प्रसंग ओढवला असून विनयभंग केल्याप्रकरणी कॉलेजमधील शिक्षक विश्वनाथ अरुण कोकाटे रा देऊळगाव कुंडपाळ ता लोणार यांच्या विरुद्ध मेहकर पोलीस स्टेशनला अपराध क्रमांक८१/२०२४ नुसार भा.द.वि.कलम.३५४,३५४(अ),२९६,५०६ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून यामधील हकिकत अशी आहे की आरोपी शिक्षकाने फिर्यादी युवतीस तु मला फोन का केला नाहीस अशी विचारणा करीत हात धरुन अश्लील भाषेत शिविगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार फिर्यादी तरुणीने मेहकर पोलीस स्टेशनला दिली असून आरोपी शिक्षकावर विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून ठाणेदार राजेंद्र शिंगटे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक वसंत पवार करीत असून वृत्त लिहीपर्यंत आरोपी शिक्षक विश्वनाथ कोकाटेंना अटक करण्याची प्रक्रिया सुरु होती.

- Advertisement -
अन्य बातम्या
Live Tv
Advertisement
  • site logo
Polls
मौसम का हाल
Latest news
Live Scores
Rashifal
Panchang