प्रतिनिधी :-फैजल पठाण
प्रभू श्रीरामचंद्र यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या रामलिंग महाराज यांच्या यात्रेनिमित्त शिरूर आणि पंचक्रोशीतील हजारो भाविक भक्त यात्रेनिमित्त दर्शनाला जात असतात. शिवरात्री निमित्त लोक उपवास ही करतात. त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून असंख्य सामाजिक कार्यकर्ते ,संस्था, संघटना या दिवशी फळे, पाणी, खिचडी असे अनेक पदार्थ बनवून दर्शनासाठी जाणाऱ्या येणाऱ्या लोकांसाठी सोय करत असतात त्याचाच एक भाग म्हणून गेल्या अनेक वर्षापासून श्री हाईट सोसायटी मित्र मंडळाच्या वतीने ८ मार्च रोजी शिरूर येथिल श्री हाईट सोसायटी मित्र मंडळाच्या वतीने रामलिंग यात्रे निमित्त एक हजार किलो खिचडीचे भव्य असे आयोजन करण्यात आले होते. शिरूर शहरातील हे सर्वात मोठे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी श्री हाईट सोसायटी मित्र मंडळाचे अध्यक्ष संदीप पंधरकर, बाळासाहेब सोनवणे, मल्हारी काळे, दिलीप लुंकड, मनोज व प्रदीप तातेड, ललित नहार ,प्रशांत गादिया, इत्यादी मान्यवरांनी भक्तांचे स्वागत करून त्यांना खिचडी वाटप केले.
श्री हाईट सोसायटी मित्र मंडळाच्या वतीने शिवरात्रीनिमित्त 1000 किलो साबुदाणा खिचडीचे वाटप…..
Leave a comment