गजानन माळकर
तालुका प्रतिनिधी मंठा,
बालकांच्या गुण कौशल्यांना वाव मिळवण्यासाठी प्राथमिक शाळा बरबडा व बरबडा वसाहत यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या बाल आनंद मेळाव्यासाठी गावकरी मंडळी, महिला वर्गांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विद्यार्थ्यांनी लावलेल्या स्टॉलच्या पदार्थ चविष्ट व विविध प्रकारचे खाद्यपदार्थ ठेवलेले होते. बाजरीची भाकरी ठेचा, जामुन, समोसा कचोरी, भेळ, बोरकुट, चना मसाला, मटकी उसळ अशा विविध पदार्थांचा मान्यवरांनी गावकऱ्यांनी, माता बहिणींनी घेतला आस्वाद.
खरोखर बाल आनंद मेळाव्यातून विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञानाची भर पडत असते तसेच भविष्याच्या दृष्टिकोनातून व्यवहारीक ज्ञान होणे काळाची गरज झाली आहे. विविध क्षेत्रांमध्ये यावर ज्ञानाची माहिती अशा उपक्रमातून विद्यार्थ्यांना मिळत असते. असे गटशिक्षणाधिकारी अशोक सोळंके साहेब यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी गट समन्वयक काशिनाथ राठोड ,विष्णुपंत बागल (केंद्रप्रमुख) वैशाली रामेश्वर हजारे (सरपंच) राजाराम बोराडे , छगन हजारे, द्वारकादास चिंचाणे, नबाजी वटाणे , माऊली हजारे, अशोक घाटूळे ,नामदेव वटाणे, महादेव जावळे ,वेंकटराव हजारे, भागवत हजारे ,राजेश हजारे , पंडित हजारे ,संतोष हजारे, श्याम हजारे,बबन वटाणे, विठ्ठल शहाणे ,दत्तात्रय दहिवाळ, अनिरुद्ध हजारे, रवी घाटूळे , मनोहर वटाणे ,मुख्याध्यापक गजानन वायाळ, नामदेव चव्हाळ ,स्वाती बनसोडे ,मोहन तुरुकमाने व मोठ्या संख्येने पुरुष व महिला उपस्थित होते.