पालघर प्रतिनिधी :सौरभ कामडी
मोखाडा येथे झालेल्या तालुका स्तरीय कबड्डी स्पर्धेत वाकडपाडा जिल्हा परिषद शाळेतील मुलींनी प्रथम क्रमांक मिळविला.
आज पंचायत समिती चे उपसभापती व शाळा व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष यांनी वाकडपाडा जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी मोखाडा येथे पार पडलेल्या तालुका स्तरीय कबड्डी स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविल्या बद्दल त्यांचे अभिनंदन केले, तसेच शिक्षकांच्या मेहनतीचे देखील कौतुक केले.
काला झालेल्या कबड्डी स्पर्धेत करोळ जिल्हा परिषद शाळेतील मुले हे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक घेऊन आल्या बद्दल सरपंच श्री नरेंद्र येले यांनी देखील मुलांचे कौतुक केले आहे. शाळा स्तरावरील या कामगीरी मुळे भविष्यात हे विद्यार्थी चांगले कबड्डी खेळतील अशी अपेक्षा श्री प्रदीप वाघ यांनी व्यक्त केली आहे.
Users Today : 28