एखादं भला प्रकल्प
बड्या मुश्किले मिळे
अधिक लालचं दिसे
दुसऱ्याराज्यात पळे
कळत नसते कुठून
कसे कुठे तेल गळे
विरोधक सदा तयार
काढत बसतात गळे
रंगतआलेली योजना
लावून जातात टाळे
कुणी घालवला खरा
स्पष्ट बोलाया टाळे
योजनाफसली कशी
सांगकुणा कुणामुळे
प्रकाशात येणारं गा
कसे लपवालं काळे
कुठवररूजली आहे
पहावी ती पाळेमुळे
रे अस्पष्टस्पष्टिकरण
विश्वास ठेवतो खुळे
बाकी प्रकल्प जपावे
उघडे ठेवून बा डोळे
टपलेली बाकी राज्ये
लाळ टपा टपा गळे
– हेमंत मुसरीफ पुणे .
9730306996
www.kavyakusum.com
Users Today : 1