भारत झाला स्वतंत्र
मुक्तता केली सशर्त
मराठवाडा तरसला
कसा मुक्ती प्रित्यर्थ
मराठवाडासंग्रामास
दावली दिशा सार्थ
आंदोलनाचे अध्वर्यू
स्वामीरामानंद तीर्थ
नेतृत्व लाभले त्यांचे
लढा बनला समर्थ
निजामी असूरीवृत्ती
फक्त बोकाळे स्वार्थ
रझाकार अत्याचारी
मातला केला अनर्थ
लांडगा पिसाळलेला
प्रयास सगळे व्यर्थ
शहीदाची ती आहुती
करी प्रयासाची शर्थ
स्वैराचार का नसावा
आज जाणवतोअर्थ
स्वातंत्र्य का मिळावे
कळे खरा अन्वयार्थ
पोलादी पुरुष पटेल
जणू महाभारतपार्थ
मिळवून देती विजय
मराठवाडा होई तीर्थ
– हेमंत मुसरीफ पुणे
9730306996
www.kavyakusum.com
Users Today : 1