खामगाव दि.१५(उमाका)- महाराष्ट्र शासनाच्या वतीने १७ सप्टेंबर ते ०२ऑक्टोंबर २०२२ या कालावधीत राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवाडा आयोजित करण्यात येत आहे १७ सप्टेंबर हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिन असून २ ऑक्टोंबर ही महात्मा गांधी यांची जयंती आहे या निमित्त हा पंधरवडा सेवा पंधरवाडा म्हणून साजरा करण्यात येणार आहे.या अभियानांतर्गत शासनामार्फत नागरिकांना सेवा देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या विविध शासकीय योजनांचा आढावा घेऊन जनतेच्या मागण्या, समस्या, तक्रारींचा, निपटारा करण्यात येणार आहे. यामध्ये सर्वसामान्य जनतेची कामे व्हावीत म्हणून शासनाने २०१५ मध्ये आपले सरकार सेवा पोर्टलसुरू केले, या माध्यमातून जनतेची कामे विहित कालमर्यादेत पूर्ण होणे अपेक्षित आहे. मात्र, पोर्टलचा आढावा घेतला असता मंत्रालय स्तरावर योजनेच्या तक्रारींचा निपटारा होत नसल्याचे निदर्शनास आले. तेव्हा, या सेवा पंधरवड्यात सर्व प्रलंबित संदर्भ अर्ज तक्रारींचा निपटारा करण्यात येणार आहे.
या सेवा पंधरवड्यात आपले सरकार वेबपोर्टल-४६ सेवा, नागरी सेवा केंद्र मार्फत देण्यात येणाऱ्या शासकीय सेवा या संकेतस्थळावर प्राप्त झालेल्या व १० सप्टेंबर २०२२ रोजी विविध विभागांशी संबंधित प्रलंबित असलेल्या सर्व अर्जांचा विशेष मोहीम राबवून निपटारा करण्यात येणार आहे. याशिवाय विभागांच्या स्वतःच्या योजनांशी संबंधित पोर्टरवरील प्रलंबित अर्ज व इतर १४ सेवांचा देखील यात समावेश करण्यात आला आहे. शासनाच्या या सेवा पंधरवाडा विषयी नागरीकांना माहिती देण्यात येणार आहे. या कालावधीत मान्यवरांच्या भेटी विविध शिबिरांचे आयोजन करणे त्याला प्रसार माध्यमातून प्रसिद्धी करण्यात येणार आहे.