बुलढाणा : जागतिक स्तरावर भरारी — सागर बोर्डे एशियन आंतरराष्ट्रीय लेक्रॉस स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड

KHOZ MASTER
2 Min Read

डोणगाव प्रतिनिधी :

आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेची मान्यता प्राप्त आणि २०२८ च्या ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये समाविष्ट असलेल्या लेक्रॉस या खेळात बुलढाणा जिल्ह्याचा अभिमान वाढवणारी कामगिरी सागर बोर्डे या प्रतिभावान खेळाडूने केली आहे. सौदी अरेबियामध्ये १८ ते २२ नोव्हेंबर २०२५ रोजी होणाऱ्या Asian International Senior Lacrosse Championship स्पर्धेसाठी त्यांची भारतीय संघात निवड झाली आहे.
राज्य व राष्ट्रीय स्तरावर केलेल्या उल्लेखनीय कामगिरीमुळे ही बहुमानाची निवड सागर बोर्डे यांना मिळाली आहे. लेक्रॉस फेडरेशन ऑफ इंडिया मान्यतेने आणि लेक्रॉस असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या अधिपत्याखाली पुणे येथे १४-१५ एप्रिल २०२५ रोजी महाराष्ट्र स्क्वॅश अकॅडमी, उंद्री येथे राज्यस्तरीय स्पर्धा झाली होती. यात बुलढाणा जिल्हा संघाचे नेतृत्व करताना त्यांनी उत्कृष्ट प्रदर्शन करीत सिनिअर गटामध्ये द्वितीय क्रमांक पटकावला.
राज्यस्तरानंतर २९ एप्रिल ते १ मे २०२५ दरम्यान आग्रा येथे झालेल्या राष्ट्रीय लेक्रॉस स्पर्धेतही सागर बोर्डे यांनी दमदार खेळ सादर केला. त्याच प्रदर्शनाच्या बळावर त्यांची थेट भारतय संघात निवड झाली.
भारतीय संघात निवड झाल्याबद्दल लेक्रॉस असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे जनरल सचिव डॉ. मोहम्मद बाबर, असोसिएशन ऑफ बुलढाणा अध्यक्षा सौ. ज्योती निळे, आंतरराष्ट्रीय खेळाडू व प्रशिक्षक श्रीराम निळे, जिल्हा क्रीडा अधिकारी बाळकृष्ण महानकर, शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त श्री. शेषनारायण लोढे, निलेश इंगळे, विजय वाळेकर, प्रकाश करंडे, नितीन जेउघाले, अनिल महाले व दीपक माठे यांनी सागर बोर्डे यांचे अभिनंदन करून भावी स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
बुलढाणा जिल्ह्यातील तरुण खेळाडूंना प्रेरणा देणारी ही निवड असून, आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी सागर बोर्डे यांच्यासाठी मोठा सन्मान मानला जात आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *