घरभरे पाहुण्यांनी
कमी पडती सराय
स्मशानेही पुरेना रे
जागा नाही मराय
जमीनीच्या मर्यादा
जागा नुरली पुराय
गर्दीअशी दाटलेली
वाट न मुंगी शिराय
जनसंख्या डोईजड
पृथ्वीलागली भराय
परग्रही असावे गृह
नजर तिथेही जाय
प्रदुषण असह्य होई
निसर्गास लागे हाय
लोकसंख्या वाढतेचं
पसरतात हात पाय
अन्न पाणी तुटपुंजे
शीतेही वाटून खाय
वेळेवर जागृत व्हावे
करा जालीम उपाय
सुशिक्षित नरभक्षक
जीवन होई अपाय
संततीचे रे नियंत्रण
दुजा न दिसे पर्याय
– हेमंत मुसरीफ पुणे.
9730306996.
www.kavyakusum.com
Users Today : 1