पंचायत निवडणूक
आले सगळे रंगात
निर्भेळ गावचे रक्त
उसळून यावे अंगात
प्रलोभन अविचारही
नको यायला मनात
मतदान कर्तव्य असे
घुमावे शब्द कानात
गावाची माती गोड
लक्ष्मणरेषा प्रचारात
पोक्त पणा मुरलेला
दिसावा तो विचारात
जिंकताचं निवडणूक
उत्सव न ते उन्मादात
पराजीत उमेदवाराने
स्विकारावे आनंदात
सुशिक्षीतआहा जाणा
कसूर नको कर्तव्यात
खास असते ही खुर्ची
असोआगळी विख्यात
– हेमंत मुसरीफ पुणे.
9730306996
www.kavyakusum.com
Users Today : 1