तहसीलदार संतोष काकडे यांनी गाठला सहाशे किलोमीटरचा पल्ला

Khozmaster
2 Min Read

17 व 18 सप्टेंबर रोजी Washim Randonneuring Club द्वारे आयोजित केलेल्या वाशीम-अमरावती-मोर्शी-वरुड-पांढुरणा-सावनेर midc व परत वाशीम अशा 600 KM BRM सायकलिंग जी 40 तासांमध्ये पुर्ण करणे आवश्यक असतांना मी ती स्पर्धा 35 तास 20 मिनिट मध्ये पुर्ण केली.भारतात या स्पर्धा Audax India द्वारे आयोजित केल्या जातात.त्यांचे कॅलेंडर 1 नोव्हेंबर ते 31 ऑक्टोबर असे असते.एक वर्षात जो रायडर 200,300,400 व 600 किमी अंतर सायकल द्वारे पुर्ण करतो त्याला SR म्हणजे Super Randonneur हा किताब मिळतो.मी या वर्षी चारही स्पर्धा पुर्ण केल्यामुळे मी SR पदवीचा मानकरी बनलो आहे.मी साधारणतः जानेवारी महिन्यात सायकलिंग सुरू केली.20,25 किमी गेलो तरी दमल्यासारखे वाटायचे.कारण व्यायामाची सवय नव्हती पण नंतर सवय करून घेतली व फेब्रुवारी महिन्यात 200 KM BRM पुर्ण केली.मार्च ते मे महिन्यात ऊन खुप असते त्यामुळे शक्यतो EVENT नसतात. नंतर सलग 3 महिन्यात उरलेल्या तीनही EVENT पुर्ण केल्या.माझ्या BUCKET LIST मधील एक स्वप्न पुर्ण झाले.लोक म्हणतात की आमच्याकडे या गोष्टींसाठी वेळ नाही.वेळ मिळत नसतो तो काढावा लागतो.तसेच व्यायाम हि काळाची गरज आहे.अमरावती सायकलिंग असोसिएशन,वाशीम क्लब,अहमदनगर सायकलिंग क्लब,सायकलिंग फेडरेशन ऑफ अहमदनगर,बुलडाणा सायकलिंग ग्रुप व शेवगाव सायकल क्लब च्या सर्व सायकलिस्ट यांनी वेळोवेळी मला प्रोत्साहन दिले त्याबद्दल सर्वांचे आभार. सायकलिंग साठी वेळ काढणे महत्वाचे असते,आहार व्यवस्थित असावा लागतो. त्याची जबाबदारी माझी पत्नी सौ वैशाली हिने समर्थपणे पार पाडली.त्याबद्दल तिचे सुद्धा आभार.तसेच माझे आई वडील व सर्व कुटुंब,नातेवाईक, मित्रपरिवार ,हितचिंतक सर्वांचे आभार मानुन थांबतो.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *