धारा वाहे धडाधडा
कोसळतात मेघघन
वीज खेळे लपंडाव
त्रस्तावले सारे जन
अशा वेळी सकला
आठवितो वायरमन
शिव्याशाप द्या तया
एक करी माय भन
फोनवर करा फोन
अस्वस्थ सारे जण
वीज बील थकलेले
विचारतो कोण पण
पोलवरती वायरमन
धोक्या घाले जीवन
लवकर करा काम
चालू आपले स्तवन
वीज जाताअस्वस्थ
करी सारे भुणभुण
लाईटली घेणे नाही
करी नीत कुणकुण
प्रकाश अखंड हवा
अंधारले मात्र मन
धन्यवाद शब्दनाही
नमस्कार ना नमन
– हेमंत मुसरीफ पुणे.
9730306996
www.kavyakusum.com
Users Today : 1