ओझोन दिनानिमित्त वनअधिकाऱ्यांची कार्यशाळा.

Khozmaster
1 Min Read

अकोला- ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ या कार्यक्रमांतर्गत अकोला वनविभागातील वन अधिकाऱ्यांची कार्यशाळा आयोजीत करण्यात आली.  ओझोन दिनाचे औचित्य साधून या कार्यशाळेचे आयोजन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे शेतकरी सदन सभागृहामध्ये करण्यात आले. सेवा निवृत्त विभागीय वन अधिकारी संजय पार्डीकर यांनी या कार्यशाळेस मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी भारतीय वन अधिनियम १९२७ व महाराष्ट्र वन नियमावली २०१४ बाबत मार्गदर्शन केले. या कार्यशाळेस अकोला वन विभागाचे उपवनसंरक्षक अर्जुना के.आर., सहायक वनसंरक्षक सुरेश वडोदे तसेच अकोला वनविभागातील सर्व वनपरिक्षेत्र अधिकारी, वनपाल व वनरक्षक उपस्थित होते. वन वन्यजीव व पर्यावरण यांचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी क्षेत्रीय अधिकारी कर्मचाऱ्यांना वन कायद्यांची प्रभावी अंमल बजावणी करण्यासाठी या कायद्याबाबत इत्यंभूत माहिती या कार्यशाळेतून क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना करुन देण्यात आली. तसेच वन कायद्यांबाबत उजळणी व शंका निरसन ही करण्यात आले.

0 8 9 4 7 1
Users Today : 1
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *