गळाया लागले घर
भोके पडलेला पत्रा
हलू पाहतात भिंती
घरघर लागली छत्रा
सगळ्या शरीरारोग
जपावे कुठले गात्रा
तांत्रीकमांत्रिक केले
रे लागू पडेना मात्रा
सुरु करुन चौकशा
डाग लावता चरित्रा
आपलेचं करती वार
माहिती कुणा खतरा
चुकीचे पत्त्या वरती
का धाडले उगा पत्रा
आमच्या अंगावरती
भुंकतो आमचाकुत्रा
कोण जाईल सोडून
स्वभाव अति भित्रा
निखळू जाती मोती
तोडून नाजूक सुत्रा
कसे जिंकावे युध्दा
गंजून गेलेल्याशस्त्रा
समोरची सेनातयार
धार लावतोयं अस्त्रा
इकडे उरले निवडक
उसळे तिकडे जत्रा
बंडाचा पाहूनि झेंडा
बदलला का पवित्रा
– हेमंत मुसरीफ पुणे.
9730306996.
www.kavyakusum.com
Users Today : 1