अल्पवयीन मुलीस छेडछाड करून विनयभंग पातुर पोलिसात चार जणांविरुद्ध पोस्को सह गुन्हा दाखल पालकांमध्ये भीतीचे वातावरण

Khozmaster
2 Min Read

पातूर प्रतिनिधी रामेश्वर वाढी : पातुर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या टी के व्ही चौक जणू चिडीमार चौक झाला आहे अस म्हटले तर त्यात काही वाईट नाही या चिडिमारी करण्याऱ्य वर पोलीस प्रशासन ने कठोर कारवाई केली तर या वर कायमतर नाही पण थोडाफार फरक नक्की पडेल याच एका चिडीमारणे इयत्ता नववी मध्ये शिकत असलेल्या पंधरा वर्षाच्या अल्पवयीन मुलीचा सतत पाठलाग करून आरोपी महेश बाळू सौंदळे आणि त्याचे तीन मित्र तिची छेडछाड करून त्रास देत होते.

तर दिनांक 19/9/2022 ला सहा वाजताच्या दरम्यान सदर अल्पवयीन विद्यार्थिनी शाळेच्या प्रवेशद्वारामधून प्रवेश करीत असताना आरोपी महेश बाळू सौंदळे याने तिचा हात धरला तसेच त्याचे तीन मित्र यांनी सुद्धा तिला महेश सोबत जाण्याचा दम भरला तर आरोपी महेश याने मुलीचा हात धरून तिच्या कमी कपड्यातील फोटो दाखवत आणि अंगावर ऍसिड फेकण्याची धमकी देऊन तिचा विनयभंग केला व तिच्या वर्गामध्ये जाऊन शिक्षकांसोबत वाद घालून शाळेतील खुर्च्या आणि घड्याळ फोडले, तसेच तिच्या लहान भावाला सुद्धा मारहाण केली, अशी तक्रार अल्पवयीन मुलीच्या आईने पातुर पोलिसात दिल्यावरून पातुर पोलिसांनी महेश बाळू सौंदळे तथा त्याचे तीन मित्र यांचे विरुद्ध कलम 354,354 ड, 341, 323, 427, 506, 34 सह कलम 8, 12 पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

सदर घटनेमुळे शाळेमध्ये शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीच्या असुरक्षिततेबाबत पालकांमध्ये कमालीची भीती व्यक्त होत असून चौका चौकात होत असलेल्या चिडीमारांवर वचक असणे आवश्यक आहे चिडीमारी करणाऱ्या युवकांची टोळके सतत फिरत असतात, काही काम नसताना कॉलेज आणि विद्यालयांमध्ये प्रवेश करतात तसेच मुलींची छेडछाड करतात सदर प्रकारावर आळा घालण्यासाठी कॉलेज, महाविद्यालयातील प्राचार्य यांनी लक्ष देऊन कॉलेज, महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर आवक जावक रजिस्टर ठेवून सुरक्षारक्षकाची नेमणूक करण्याची मागणी पालक वर्गातून होत आहे.

 

0 8 9 4 5 6
Users Today : 22
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *