अकोला (भूषण महाजन) – जिल्ह्यात झालेल्या संततधार पाऊस, अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे शेतीपिकांच्या नुकसानीसाठी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना 130 कोटी 9 लक्ष 53 हजार रुपयांचा निधी विभागीय आयुक्त यांच्या आदेशानुसार जिल्ह्यास प्राप्त झाला आहे. हा निधी विविध लेखाशिर्षाखाली संबधित तहसिलदार यांना वितरीत करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी दिली.
आदेशानुसार तालुकानिहाय निधी वितरण याप्रमाणे : अकोला तालुक्याकरीता 49 कोटी 31 लक्ष 53 हजार, बार्शीटाकळीकरीता 29 लक्ष 24 हजार, अकोटकरीता 19 कोटी 75 लक्ष 24 हजार, तेल्हाराकरीता 3 कोटी 23 लक्ष 72 हजार, बाळापूरकरीता 53 कोटी 88 लक्ष 21 हजार तर मुर्तीजापूरकरीता 3 कोटी 61 लक्ष 59 हजार असे एकूण 130 कोटी 9 लक्ष 53 हजार रुपये संबंधित तहसिलदार यांच्याकडे विविध लेखाशिर्षाखाली वितरीत करण्यात आले आहे.
अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांना विभागीय आयुक्त यांच्या आदेशानुसार 130 कोटी निधी वितरित
Leave a comment