युवक राष्ट्रवादी काँग्रेसची निवेदनाद्वारे मागणी..
देऊळगाव राजा/(शब्दनायक):- आज दिनांक 21/09/2022 रोजी पशुधन विकास अधिकारी(विस्तार) देऊळगाव राजा तालुका संदीप उदार यांच्या मार्फत जिल्हा पशुधन विकास अधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले. सदर निवेदनात म्हटले आहे की देऊळगाव राजा तालुक्यासह बुलढाणा जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणामध्ये जनावरांवर लंपी आजाराचा प्रादुर्भाव दिसून येत आहे त्यामुळे अनेक जनावरे मरण पावत आहेत परन्तु देऊळगाव राजा तालुक्यातील डीग्रस ,खैरव ,देऊळगाव मही,मंडपगाव ,टाकरखेड भागीले, सह इतर गावामध्ये लंपी आजार असलेले जनावर असून त्यांना योग्य प्रकारे मार्गदर्शन, योग्य ती मदत पशुवैद्यकीय विभागामार्फत मिळाली नाही.शासनाने याची तात्काळ दखल घेऊन गावोगावी लसीकरणाची कॅम्प तात्काळ आयोजित करावे सदर कॅम्पची तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी अंमलबजावणी न झाल्यास राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेस बुलढाणा यांच्या वतीने देण्यात आला.यावेळी राष्ट्रवादी युवक जिल्हा सचिव प्रमोद पाटील घोंगे ,आदील एच पठाण राष्ट्रवादी युवक जिल्हा सह सचिव,अरविंद खांडेभराड,युवक शहर अध्यक्ष,बलवंत सिंह बावरे,आकीब खान कोटकर,निलेश गीते,विशाल पवार,समीर खान,ज्ञानेश्वर डोईफोडे,पंकज बैरागी,शाजेब कोटकर,सुनील झोरे ,ऋषिकेश शेजुळकर,दत्ता टकले,अजमत खान, शेख फईम,यांच्या सह राष्ट्रवादी युवक पदाधिकारी सदस्य उपस्तीत होते.
Users Today : 23