सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत ऑक्टोबर महिन्यासाठी जीवनावश्यक वस्तू वाटप परिमाण निश्चित

Khozmaster
1 Min Read

अकोला –  जिल्ह्याकरीता माहे ऑक्टोंबर महिन्यासाठी  लक्ष्य निर्धारीत सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अन्नधान्य, नियंत्रित साखर इ. जीवनावश्यक वस्तूंचे वाटप परिमाण निश्चित करण्यात आले आहे.  प्राधान्य गटातील लाभार्थ्यांसाठी गहू दोन किलो प्रतिव्यक्ती,दर दोन रुपये प्रति किलो, प्राधान्य गटातील लाभार्थ्यांसाठी तांदूळ तीन किलो प्रतिव्यक्ती, तीन रुपये प्रति किलो,   अंत्योदय अन्न योजना गहू- 15 किलो प्रति कार्ड, दोन रुपये प्रति किलो, अंत्योदय अन्न योजना तांदूळ- 20  किलो प्रति कार्ड, तीन रुपये प्रति किलो, नियंत्रित साखर अंत्योदय लाभार्थ्यांना लहानमोठा भेदभाव न करता साठ्याचे उपलब्धेनुसार एक किलो प्रति शिधापत्रिका, 20 रुपये प्रतिकिलो अशाप्रकारे दर व वाटप निश्चित करण्यात आलेले आहे.

हे वाटप परिमाण गोदामातील साठ्याच्या व लाभार्थ्यांच्या संख्या उपलब्धतेनुसार राहील,असे जिल्हा पुरवठा अधिकारी बी. यु. काळे यांनी कळविले आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *