क्रीडा विषयक अनुदानासाठी प्रस्ताव सादर करावे जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील

Khozmaster
2 Min Read

प्रतिनिधी; प्रा. भरत चव्हाण-नंदुरबार

 

 

 

नंदुरबार : शासनाच्या क्रीडा विभागांतर्गत व्यायामशाळा विकास योजना, क्रीडांगण विकास योजना, युवक कल्याण योजना अशा क्रीडा विषयक अनुदान योजना राबविण्यात येत असून या तीनही योजनेचा लाभ घेण्यासाठी 30 सप्टेंबर 2022 पर्यंत प्रस्ताव सादर करावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील यांनी केले आहे.

 

व्यायामशाळा विकास योजनातंर्गत नवीन व्यायामशाळा बांधकाम करणे, व्यायामशाळा इमारत नूतनीकरण (15 वर्ष जूनी असल्यास), व्यायामशाळा साहित्य खरेदी व खुले व्यायामशाळा साहित्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय शाळा, आश्रमशाळा, अनुदानीत शाळा, कनिष्ठ महाविद्यालय व शासकीय कार्यालयानी प्रस्ताव सादर करावे.यासाठी कमाल 7 लाख इतके अनुदान मंजूर करण्यात येते.

 

क्रीडांगण विकास योजनेतंर्गत क्रीडांगण समपातळीत करणे, 200 ते 400 मीटर धावनपथ तयार करणे, क्रीडांगणास भिंतीचे, तारेचे कुंपण घालणे, विविध खेळांची एक किंवा अधिक प्रमाणात क्रीडांगणे तयार करणे, प्रसाधनगृह, चेंजींग रुम, पिण्याच्या व मैदानावर मारण्यासाठी आवश्यक पाण्याची सुविधा निर्माण करणे, भांडारगृह बांधणे, फल्ड लाईटची सुविधा निर्माण करणे, क्रीडा साहित्य खरेदी करणे, क्रीडांगणावर मातीचा, सिमेंटचा भराव असलेली प्रेक्षक गॅलरी, आसन व्यवस्था तयार करणे, प्रेक्षक गॅलरी, आसनव्यवस्थेवर शेड तयार करणे, क्रीडांगणाभोवती ड्रेनेज व्यवस्था तयार करणे, मैदानावर पाणी मारण्यासाठी स्प्रिकलर यंत्रणा बसविणे, व मैदानावर रोलींगसाठी हँड मिनी रोलर खरेदी करणे इत्यादी बाबींसाठी 7 लाख रुपये कमाल मर्यादेत व क्रीडा साहित्य खरेदीसाठी 3 लक्ष अनुदान देण्यात येते. योजनेचा लाभ घेण्यासाठी 100 टक्के अनुदानित शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, आश्रमशाळा, जिल्हा परिषद शाळा व शासकीय शाळांनी प्रस्ताव सादर करावे.

युवक कल्याण योजनातंर्गत ग्रामीण, नागरी भागातील नोंदणीकृत युवक मंडळांना आर्थिक सहाय्य तसेच नोंदणकृत युवक मंडळांना स्वंयरोजगार प्रशिक्षण शिबीरे, सामाजिक क्षेत्रात प्रशिक्षण शिबीर आयोजनासाठी 25 हजार कमाल मर्यादेपर्यंत अनुदान देण्यात येते. योजनेच्या अधिक माहितीसाठी व वरील सर्व घटकासाठी योजनानिहाय अर्ज जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा संकुल परिसर, खामगांव रोड,नंदुरबार येथे उपलब्ध असून परिपूर्ण प्रस्ताव दोन प्रतीत आवश्यक कागदपत्रांसह सप्टेंबर 2022 पर्यंत कार्यालयीन वेळेत समक्ष सादर करावे.

0 8 9 4 5 6
Users Today : 22
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *