प्रतिनिधी प्रा. भरत चव्हाण नंदुरबार,: जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, नंदुरबार कार्यालयामार्फत ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा’ 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत अर्जदाराचे प्रलंबित अर्ज, प्रस्ताव निकाली काढण्यात येणार असल्याने अनुसूचित जमाती वगळून ज्या मागासवर्गीय प्रवर्गाच्या अर्जदारांनी जात प्रमाणपत्राचे प्रस्ताव त्रृटी अभावी प्रलंबित आहे. अशा अर्जदारांनी त्रृटींची पूर्तता करुन 27 सप्टेंबर 2022 पर्यंत अर्ज जमा करावे. असे आवाहन असे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे संशोधन अधिकारी तथा सदस्य श्रीमती प्राची वाजे यांनी केले आहे.
Users Today : 22