प्रतिनिधी प्रा. भरत चव्हाण नंदुरबार : राजा राममोहन रॉय यांच्या 250 व्या जयंती निमित्ताने जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय नंदुरबार यांच्या वतीने 22 सप्टेंबर, 2022 रोजी सकाळी 10.00 वाजता महिला सक्षमीकरणावर विद्यार्थ्यांची रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीत जिल्ह्यातील जास्तीतजास्त नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी धरमसिंग वळवी यांनी केले आहे.
या रॅलीचे उद्घाटन जिल्हाधिकारी मनिषा खत्री यांच्या हस्ते होणार आहे असून कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा पोलीस अधिक्षक पी.आर. पाटील हे आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संचालक श्रीमती शालिनी इंगोले, राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठाण कलकत्ताचे क्षेत्रिय अधिकारी अनंत वाघ, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) एम.व्ही. कदम, जिल्हा ग्रंथालय संघ अध्यक्ष पितांबर सरोदे, जिल्हा ग्रंथालय संघ उपाध्यक्ष रमाकांत पाटील हे उपस्थित राहणार आहेत.
या रॅलीची प्रारंभ नेहरु पुतळा नंदुरबार येथून होणार असून नगरपालिका-आमदार कार्यालय-अंधारे स्टॉप फिरुन छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिर येथे समारोप होणार आहे.
Users Today : 22