नांदुरा प्रतिनिधी (शुभम ढवळे) : फॉक्सकॉन वेदांता प्रकल्प १ लाख ५८ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असून हा प्रकल्प महाराष्ट्रात होणार होता. पण सरकार बदलताच हा प्रकल्प गुजरात राज्यात गेला यामुळे महाराष्ट्राचे मोठे आर्थिक नुकसान तर झालेच. पण सोबतच १ लक्ष तरुणांचा रोजगार ही गेला.
महाराष्ट्र हे गुंतवणुकदारांच्या पसंतीचे पहिल्या क्रमांकाचे राज्य आहे. परंतु आधीचे सरकार जाताच अडीच महिन्यात असे काय झाले की फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेला. यापूर्वीही राज्यात फडणवीस सरकार असताना मुंबईतील आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्रही गुजरातला हलवण्यात आले. अनेक महत्वाचे प्रकल्प व कार्यालयेही गुजरातला हलवण्यात आली. बुलेट ट्रेनची गरज नसतानाही महाराष्ट्राच्या माथी हा प्रकल्प लादला गेला. आता पुन्हा महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला जात आहेत. हा महाराष्ट्रासोबत जाणीवपूर्वक केलेला द्वेषपूर्ण अन्याय आहे.
फॉक्सकॉन – वेदांता ह्या प्रकल्पाची एकूण गुंतवणूक १ लाख ५८ हजार कोटींची आहे, हा प्रकल्प पुण्याजवळ तळेगाव दाभाडे येथे होणार होता.हा प्रकल्प गुजरातला हलविण्यात आला हा महाराष्ट्रावर मोठा अन्याय आहे.तरी हा प्रकल्प तत्काळ परत महाराष्ट्रात आणावा जेणेकरून १ लाख तरुणांचा पोटापाण्याचा प्रश्न मिटेल व यातून महाराष्ट्राला ही आर्थिक सहाय्य होईल करिता आज दिनांक २१ सप्टेंबर २०२२ रोजी संभाजी ब्रिगेडच्या वतीने नांदुरा तालुकाध्यक्ष अमर रमेश पाटील यांच्या नेतृत्वात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर रास्ता रोको करण्यात आला व हा प्रकल्प जो पर्यंत महाराष्ट्रात परत येत नाही तोपर्यंत आम्ही आक्रमक आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे संभाजी ब्रिगेड नांदुरा तालुकाध्यक्ष अमर रमेश पाटील यांनी सांगितले.यावेळी शिवसेना नांदुरा तालुकाप्रमुख ईश्वर पांडव,संभाजी ब्रिगेड नांदुरा तालुका उपाध्यक्ष अमोल पाटील,शहर उपाध्यक्ष कुलदीप डंबेलकर,प्रमोद भगत,मोहन चिमकर,कैलास काटे,गजाननसिंग राजपूत,दीपक ढोले,गणेश भोपळे,अमोल घोराडे,भगिरथ मनस्कार,विशाल घोंगटे,सागर कळमकर,कपिल पाटील,मधुसूदन पुंडकर,सुरेशसिंग डाबेराव,गजानन वाकुडकार,अविनाश कोल्हे,भूषण श्रीखंडे,अक्षय महाले,पत्रकार पुरुषोत्तम भातुरक,पत्रकार राहुल खंडेराव,सागर जुमडे,मयूर मेढे,प्रशांत काकर,दत्तात्रय करांगळे,निखिल देशमुख व इतर बहुसंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Users Today : 22