दिपक मापारी, रिसोड महिला आणि लहान मुलांमधील कुपोषण रोखण्यासाठी या वर्षी राष्ट्रीय पोषण महिन्याचे निमित्त साधून जिल्हा स्तरावर विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्यातीलच एक भाग म्हणून अंगणवाडी घोटा येथे स्वस्थ बालक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले त्यामध्ये गावातील सर्वच स्तरावरील महिलांचा मातांचा उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदविला. त्या बालकांची मासिक वाढ वैयक्तिक स्वच्छता पोषण स्थिती आहार व उपस्थिती वेळेवर लसीकरण आणि जंतुनाशक गोळ्या या निकषानुसार बालकांची निरीक्षणे नोंदवून त्या आधारे गुणानुकृम देऊन बालकाची स्पर्धा पार पडली. त्यामध्ये ६ महिने ते ३ वर्ष
वयोगट १) स्वराज दशरथ मोरे, २) अनिकेत राहुल मोरे,३)स्पंदना ज्ञानेश्वर मोरे,
वयोगट ३ वर्ष ते ५ वर्ष १) सुशांत परमेश्वर सोनुने,२) रवीना मारुती गायकवाड, ३) प्रवीण माधव गायकवाड, वरील सर्व बालकांना जास्तीत जास्त गुण मिळवून क्रमांक पटकाविले.
त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले तसेच त्यांना बक्षीस वितरण करून खाऊ वाटप करण्यात आला.
यावेळी – अंगणवाडी सेविका सौ. शारदा सुधाकर मोरे, तसेच विविध महिला बचत गटाच्या भगिनीं स्तंनदा माता, गरोदर माता, सर्व गावकरी महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला..
Users Today : 27