सेनगाव तालुक्यातील चार प्रशासनाने अतिवृष्टी अनुदानातून वगळलेल्या मंडळामध्ये दैनिक आताच एक्सप्रेस बालाजी देशमुख यांचा ग्राउंड रिपोर्ट. आपण पाहू शकता सेनगाव तालुक्यातील या चार मंडळामध्ये प्रशासनाने चुकीच्या पर्जन्यमापक यंत्राच्या साहाय्याने अतिवृष्टीच्या अनुदानापासून वंचित ठेवलेल्या चार मंडळामधील ग्राउंड रिपोर्ट आपण पाहिला असेल अक्षरशा दहा ते वीस सोयाबीनच्या झाडांना दहा शेंगा आहेत शेतकऱ्याचे बियाणे त्यापेक्षा जास्त पेरणी करण्यासाठी लागले आहे ग्राउंड लेव्हलची परिस्थिती अशी असताना प्रशासनाने चुकीचे अहवाल दाखवून पुसेगाव आजेगाव बाभूळगाव गोरेगाव या सेनगाव तालुक्यातील चार मंडळातील लाखो शेतकऱ्यांना अतिवृष्टी अनुदानातून वगळले आहे त्यामुळे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यावर शेतकऱ्यांच्या वतीने मोठा रोष निर्माण झाला आहे आपण ग्राउंड रिपोर्ट पाहिला आहे एवढ्या सुपीक जमिनीमध्ये अक्षरशः सोयाबीनच्या झाडाला एक सुद्धा शेंग नाही सोयाबीन सुद्धा वाढलेली नाही सततच्या पावसामुळे सोयाबीन पिकाला मोठा फटका बसला असताना प्रशासनाने शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडले आहे त्यामुळे संबंधित सोयाबीनचे तात्काळ पंचनामे करून या चार मंडळातील शेतकऱ्यांना तात्काळ अतिवृष्टी अनुदानामध्ये समाविष्ट करून शेतकऱ्यांना तात्काळ अनुदान वाटप करावे ही विनंती. हिंगोली जिल्हा प्रतिनिधी बालाजी देशमुख